*मित्रांनो,*
*निर्मल मनापासून :*
*" कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये ...*
*चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये ..*
*कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये ..*
*नशीबाने जुळलेली नाती जपावी पण तोडू नये ..*
:
*गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघङ वाटू नये ..*
*जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये ..*
*सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये ..*
*नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये ..*
*हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे ..*
:
*आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे....... "*
:
*कारण ...*
:
*" जीवनाच्या वाटेवर ..*
*साथ देतात,*
*मात करतात,*
*हात देतात,*
*घात करतात,*
*ती ही असतात.....*
:
*माणसं !*
*संधी देतात,*
*संधी साधतात,*
*आदर करतात,*
*भाव खातात,*
*ती ही असतात.....*
:
*माणसं !*
*वेडं लावतात,*
*वेडं ही करतात,*
*घास भरवतात,*
*घास हिरावतात,*
*ती ही असतात.....*
:
*माणसं !*
*पाठीशी असतात,*
*पाठ फिरवतात,*
*वाट दाखवतात ,*
*वाट लावतात,*
*ती ही असतात..... ..*
:
*माणसं !*
*शब्द पाळतात, ..*
*शब्द फिरवतात, ..*
*गळ्यात पडतात, ..*
*गळा कापतात, ..*
*ती ही असतात ...... ..*
:
*माणसं !*
*दूर राहतात, ..*
*तरी जवळचीच वाटतात,*
:
*जवळ राहून देखील, ..*
*परक्यासारखी वागतात, ..*
:
*ती ही असतात ...... ..*
:
*माणसं !*
*नाना प्रकारची अशी ...*
*नाना माणसं,*
:
*ओळखायचीत कशी...*
:
*सारी असतात आपलीच ...*
:
*माणसं ! "*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें